Onion Anudan Yojana :पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेला अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Anudan Yojana चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात झालेली घसरण विचारात घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये, खाजगी बाजार समिध्ये थेट पणन अनुज्ञप्तीधारकांकडे अथवा T नाफेडकडे दि. १ फेब्रुवारी २०२३ ते दि.३१ मार्च २०२३ या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रु.३५० प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान शासन निर्णय, दि. २७/३/२०२३ मध्ये नमूद केलेल्या अटीस अधीन मंजूर करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तसेच या संदर्भात शासनपत्र दि.२०/०४/२०२३ व दि.२९/०५/२०२३ अन्वये अनुदानाच्या निकषांबाबत अतिरीक्त सुचना देण्यात आल्या आहे. या योजनेअंतर्गत अनुदान वितरीत करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

पी व्ही सी पाईप अनुदान योजना; शेतकऱ्याला पाईप खरेदी वर 50% अनुदान

शासन निर्णय:-

  • Onion Anudan Yojana राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये, खाजगी बाजार समित्यामध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकांकडे अथवा नाफेडकडे दि. १ फेब्रुवारी २०२३ ते दि.३१ मार्च २०२३ या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या.
  • तसेच या संदर्भात शासनपत्र दि.२०/०४/२०२३ व दि.२९/०५/२०२३ अन्वये दिलेल्या अतिरिक्त सूचनांनुसार पात्र शेतकन्यांना रुपये ३५० प्रति क्विटल,
  • व जास्तीत जास्त २०० क्विटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी रू.५५० कोटी (अक्षरी रुपये पाचशे पन्नास कोटी फक्त) इतकी रक्कम सन २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आली असून.
  • या रकमेपैकी रू.४६५.९९ कोटी (अक्षरी रुपये चारशे पासष्ट कोटी, नव्यान्नव लाख फक्त) इतकी रक्कम वितरीत करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे.
  • यायोनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी यांचे प्रस्ताव तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांनी तपासून ते जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचेकडे सादर केले आहेत.
  • जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी पात्र प्रस्तावांची छाननी करून ती यादी पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना मान्यतेसाठी सादर केली आहे.
  • तसेच पणन संचालक, महाराष्ट्र राज्य यांनी तपासून अंतीम केलेल्या यादीनुसार पणन विभागामार्फत सदर अनुदान थेट बैंक हस्तांतरण Direct Bank Transfer) द्वारे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बचत बँक खात्यात जमा केले जाईल.
  • सदर अनुदान वितरीत करण्यासाठी सहसचिव, पणन यांच्या नांवे आयसीआयसीआय बँकेमध्ये एक चालू खाते (Current Account) उघडण्यात आले असून सदर खात्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

कांदा अनुदान जिल्हा यादी आली

Onion Anudan Yojana पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेला अनुदान

  • या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थीयांना वितरीत करावयाच्या एकूण अनुदानाची रक्कम रू. ८४४,५६,८१,७७५/- (अक्षरी रु. आठशे चव्वेचाळीस कोटी, छप्पन लाख, एक्क्याऐंशी हजार सातशे पंचाहत्तर फक्त) इतकी आवश्यक असल्याचे.
  • संदर्भ क्र.६ येथील दि. २५ जुलै २०२३ च्या पत्रान्वये कळविले आहे.
  • मात्र सद्यस्थितीत वित्त विभागाने या योजनेसाठी रु.४६५.९९ कोटी (अक्षरी रूपये चारशे पासष्ट कोटी, नव्यान्नव लाख फक्त) इतकी रक्कम खर्च करण्यास मान्यता दिली असल्यामुळे.
  • या योजनेखाली उपलब्ध रू. ४६५.९९ (अक्षरी रुपये चारशे पासष्ट कोटी, नव्यान्नव
  • लाख फक्त) कोटी इतक्या निधीतून सद्यस्थितीत खालील प्रमाणे निधी वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • रू.१०.०० कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या १३ जिल्हयातील पात्र लाभार्थ्यास संपूर्ण अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात येईल.
  • (जिल्हा नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम) (विवरणपत्र-अ. लातूर.
  • तसेच रू.१०.०० कोटी पेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या १० जिल्हयातील पात्र लाभार्थ्यास ५३.९४१७ टक्के या प्रमाणात अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात येईल.
  • (जिल्हा नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे. जळगांव, कोल्हापूर, बीड) (विवरणपत्र-ब).
  • तसेच या योजनेखाली वित्त विभागाने उर्वरित निधी उपलब्ध करून दिल्यानंतर उर्वरित पात्र लाभार्थ्यास अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात येईल.

ज्येष्ठ नागरीक अर्ज, मिळवा हक्क; असा डाऊनलोड करा फॉर्म

सोबत जोडलेले कागदपत्र

  • Onion Anudan Yojana कांदा विक्री पट्टी / पावती
  • ७/१२ पिकाची नोंद असलेला जमिनीचा सातबारा –
  • बँक पासबुक झेरॉक्स-
  • आधार कार्ड
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Onion Anudan Yojana :पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेला अनुदान”

Leave a Comment

error: Content is protected !!