Sarathi Scholarship For Maratha :इयत्ता 9 वी ते इयत्ता 11 वी मधील विद्यार्थ्यांना वार्षिक 9600 रुपये शिष्यवृत्ती मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sarathi Scholarship For Maratha सार्थी शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप मिळवण्यासाठी पात्रता काय आहे सार्थी स्कॉलरशिप 2023-24 चा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा इयत्ता नववी इयत्ता दहावी व इयत्ता अकरावी या वर्गात शिक्षण घेत असावा. या शिष्यवृत्तीचा लाभ मराठा कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा या चार गटातील विद्यार्थी घेऊ शकतात. राज्यातील सर्व शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत असे विद्यार्थी सार्थी शिष्यवृत्ती करिता पात्र आहे

असा मिळवा योजनेचा लाभ

लाभार्थी पात्रता काय ?

  • Sarathi Scholarship For Maratha NMMS म्हणजे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम ही परीक्षा उत्तीर्ण असलेला म्हणजे पास झालेला व केंद्र शासनाची शिष्यवृत्तीसाठी अपात्र असलेल्या,
  • तसेच 9 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मराठा कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा या लक्ष्यात गटातील अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र समजण्यात येईल.
  • इयत्ता दहावी मध्ये नियमित शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता नववी मध्ये 55% गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे 9 वी मध्ये 55% मार्क असणे गरजेचे आहे.
  • इयत्ता 11 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी मध्ये 60% गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • इयत्ता 9 वी मधील प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाख 50 हजार पेक्षा कमी असावे.
  • इयत्ता 10 वी व 11 वी मधील प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी असावेत.
Sarathi Scholarship For Maratha 

मोबाईल ॲपवरून कर्ज घेतल्यानं ग्राहकांचा छळ होतो का?

कोणते विद्यार्थी स्कॉलरशिप साठी पात्र नाही Sarathi Scholarship For Maratha 

  • विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच स्वयं अर्थ सहाय्यक शाळेतील विद्यार्थी व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी,
  • याप्रमाणे केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी,
  • जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी,
  • शासकीय वस्तीगृहाच्या सवलतीच्या भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी, आणि सैनिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी,
  • या सर्वांना सारखी स्कॉलरशिप चा लाभ घेता येत नाही.

स्कॉलरशिप मिळवण्यासाठी आवश्यक

  • यात सर्वात महत्त्वाचा आहे तो अर्ज म्हणजे नववी दहावी आणि अकरावी या प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • या प्रत्येक अर्जाची लिंक वर दिलेली आहे त्यावर क्लिक करून तो तुम्ही डाऊनलोड करू शकता.
  • तसेच या शिष्यवृत्ती संदर्भात सविस्तर माहितीचे एक पत्र छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांकडून 11 जुलै 2023 रोजी जारी करण्यात आले आहे.
  • त्या पत्राची सुद्धा लिंक खाली दिलेली आहे.Sarathi Scholarship For Maratha 

अर्ज नामुन्यासाठी क्लिक करा

अर्ज कोणते आणि ते कागदपत्रांसह कुठे जमा करायचे Sarathi Scholarship For Maratha 

  • तर त्या त्या इयत्तेनुसार भरलेला आणि विद्यार्थ्यांची सही असलेल्या अर्जासोबत मुख्याध्यापकांचे किंवा प्राचार्यांचे सही केलेले विहित नमुन्यातील शिफारस पत्र,
  • विद्यार्थ्यांच्या पालकांचा तहसीलदाराच्या स्वाक्षरीतील म्हणजे सही असलेला चालू वर्षातील उत्पन्नाच्या दाखल्याची सत्य प्रत,
  • विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची सत्य प्रत,
  • विद्यार्थ्यांचे स्वतःचे नावे बँक पासबुकच्या पहिल्या पानाची सत्य प्रत,
  • म्हणजे त्या पानावर विद्यार्थ्यांचे नाव असले पाहिजे अकाउंट नंबर असला पाहिजे बँकेचा आयएफएससी कोड असायला पाहिजे.
  • दहावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घेण्यासाठी 9 वीचे मार्कशीट द्यावे लागेल, त्यामध्ये पहिल्याच वेळेस 55% गुणांसह पास होणे गरजेचे आहे.
  • तसेच अकरावीचे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत पहिल्याच वेळेस 60% गुणांसह पास झालेले असणे गरजेचे आहे,
  • या दोन्ही इयत्तांमध्ये तुम्ही एकदा जरी नापास झालेले असाल तरी तुम्हाला या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही.
  • त्यानंतर NMMS ही परीक्षा उत्तीर्ण असलेले गुणपत्रक किंवा निकाल पत्रक,
  • इथे दिलेले या सर्व कागदपत्रांना व्यतिरिक्त इतर कुठलेही कागदपत्र जमा करण्याची आवश्यकता नसते,
  • तर विहित नमुन्यात भरलेला अर्ज शाळा स्तरावर भरून तो गटशिक्षणाधिकारी कार्यालय येथे जमा करावा लागतो येथे ऑनलाईन लिंक वर माहिती भरली जाते.
  • तर हा अर्ज इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी भरायचा अर्ज त्याखाली असलेले प्रमाणपत्र मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचे कडून भरून सही शिक्क्यासह घ्यायचे आहे.
  • याचप्रमाणे इयत्ता दहावी आणि अकरावीच्या अर्जाचाही नमुना दिलेल्या लिंक लिंक वर जाऊन तुम्ही हे सर्व अर्ज डाऊनलोड करू शकतात.
Sarathi Scholarship For Maratha 

7 ऐसे लोन ऐप जहां से आप इंस्टेंटली पर्सनल लोन लें सकते हैं

कोणते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • Sarathi Scholarship For Maratha अपूर्ण भरलेला अर्ज, चुकीची माहिती असलेला अर्ज, अपूर्ण कागदपत्रे असलेला अर्ज, विहित मुदतीत सादर न केलेला अर्ज किंवा दुसऱ्याच व्यक्तीच्या बँक अकाउंट च्या पासबुकची झेरॉक्स जोडलेला अर्ज, असे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • म्हणूनच अर्ज भरताना तो अचूक भरा जर घरात परिसरात आणि परिचयात इयत्ता नववी दहावी आणि अकरावी मध्ये शिकणारे विद्यार्थी असतील तर त्यांच्या सोबत हि माहिती शेअर करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Sarathi Scholarship For Maratha :इयत्ता 9 वी ते इयत्ता 11 वी मधील विद्यार्थ्यांना वार्षिक 9600 रुपये शिष्यवृत्ती मिळणार”

Leave a Comment

error: Content is protected !!