Types of Ration Card :ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड साठी असा करू शकता अर्ज 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Types of Ration Card सर्वसाधारणपणे श्रीमंत कुटुंबातील व्यक्ती रेशन कार्डचा वापर करून धान्य घेताना दिसत नाही त्यामुळे जी सर्व कुटुंब रेशन दुकानातून धान्य घेतच नाही त्यांना रेशन कार्ड वर धान्य देणे बंद केले तर त्याबाबतचे गैरव्यवहार कमी होतील आणि ज्यांना कर्ज रेषांच्या धान्याची गरज आहे अशा कुटुंबांना कार्डवर धान्य उपलब्ध करून देता येईल.

याचाच विचार करून महाराष्ट्र राज्यात दिनांक पाच मे 1999 पासून ट्राय कलर रेशन कार्ड स्कीम म्हणजे तिहेरी रेशन कार्ड योजना लागू करण्यात आली आता नागरिकांना त्यांच्या पात्रतेनुसार पिवळे, नारंगी किंवा पांढरे रेशन कार्ड दिले जाते अनेकांना अजूनही या तीनही कार्ड मधील फरक माहिती नाही किंवा अर्ज करताना कोणते कार्ड योग्य त्याची कल्पना नसते.

Types of Ration Card

रोजगार हमी योजनेतून मिळणार विहीर असा करा अर्ज मोबाईलवरून

पिवळी शिधापत्रिका – Yello Ration card

  • Types of Ration Card या रेशन कार्ड साठी कुटुंबाचे नाव (आयआरडीपीच्या) सण 1997 या यादीमध्ये असणे आवश्यक असेल.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 15000 या मर्यादेत असले पाहिजे.
  • कुटुंबातील कोणतीही व्यक्ती डॉक्टर, वकील, स्थापत्य, विशारद म्हणजे आर्किटेक किंवा सीए चार्टर्ड अकाउंटंट नसावी.
  • तसेच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती प्रोफेशनल टॅक्स व्यवसाय कर सेल्स टॅक्स विक्रीकर किंवा इन्कम टॅक्स म्हणजे आयकर साठी पात्र नसावी किंवा भरणारी नसावे.
  • पिवळ्या रेशन कार्ड साठी अर्ज करणाऱ्या कुटुंबाकडे टेलिफोन कनेक्शन नसावे तसेच चार चाकी वाहनही नसावे.

जमिनी संदर्भातील निकष

कुटुंबातील व्यक्तीचे नावे – एकूण 2 हेक्टर जिरायत, 1 हेक्टर हंगामी बागायत, अर्धा हेक्टर बारमाही बागायत जमीन नसली पाहिजे

हे जमिनीचे क्षेत्र दुष्काळी तालुक्यात दुप्पट असेल या सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या कुटुंबालाच पिवळे रेशन कार्ड प्राप्त होते. त्याप्रमाणे वेळोवेळी निर्गमित शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व विडी कामगार सर्व पारधी व कोल्हाटी समाजाच्या कुटुंबांना परितक्त्या व निराधार स्त्रियांना तात्पुरत्या स्वरूपात बीपीएल शिधापत्रिका आणि बंद पडलेल्या कापड गिरण्या सूतगिरण्या साखर कारखाने इत्यादी मधील कामगारांना पिवळ्या शिधापत्रिकेचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात देण्याचा निर्णय शासनाद्वारे घेण्यात आला आहे.

Types of Ration Card

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

केसरी शिधापत्रिका – Saffron Retion Card Types of Ration Card

  • केसरी रेशन कार्ड मिळवण्यासाठी कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न रुपये 15000 पेक्षा जास्त आणि एक लाख रुपये पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त नसावे.
  • कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे चार चाकी यांत्रिक वाहन नसावे.
  • पण टॅक्सी त्यासाठी अपवाद असेल म्हणजे टॅक्सी असेल तर या रेशन कार्ड साठी अर्ज करता येईल.
  • आणि कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे मिळून चार हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त बारमाही बागायती जमीन नसावी.
  • या सर्व निकषांची पूर्तता होत असेल तरच केसरी शिधापत्रिकेसाठी अर्ज करता येईल.

शुभ्र किंवा पांढरी शिधापत्रिका – White Retion Card

  • Types of Ration Card ज्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल,
  • आणि कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे चार चाकी यांत्रिक वाहन असेल अथवा कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे मिळून चार हेक्टर पेक्षा जास्त बारमाही शेत जमीन असेल अशाच कुटुंबांना शुभ्र किंवा पांढरी शिधापत्रिका देण्यात येते.
  • तर याप्रकारे कुटुंबांच्या पात्रतेनुसार अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत योग्य शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड जारी करण्यात येते.
Types of Ration Card

शेतात येणाऱ्या वन्यप्राण्यांना पळवून लावा या यंत्राने

नवीन शिधापत्रिकेसाठी आवश्यक कागदपत्र Types of Ration Card

या सर्व रेशन कार्ड करिता अर्ज करण्यासाठी ओळखपत्र म्हणून लागणारे कागदपत्रे खालील नुसार

  • 1) आधार कार्ड
  • 2) पॅन कार्ड
  • 3) मतदान कार्ड
  • 4) ड्रायव्हिंग लायसन्स
  • 5) पासपोर्ट
  • 6) शासकीय किंवा निमशासकीय सेवा ओळखपत्र

पत्त्याचा पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे –

  • 1) पासपोर्ट
  • 2) रेशन कार्ड
  • 3) लाईट बिल
  • 4) सातबारा किंवा ८अ चा उतारा
  • 5) ड्रायव्हिंग लायसन्स
  • 6) टेलिफोन बिल
  • 7) घरपट्टी किंवा पाणीपट्टी
  • 8) मतदार सूची किंवा रेंट रिसेप्ट ही कागदपत्रे आवश्यक आहे
Types of Ration Card

महानगरपालिकेत विविध पदांची भरती, जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील..

वयाच्या पुराव्यासाठी लागणारी कागदपत्रे –

  • 1) बर्थ सर्टिफिकेट
  • 2) बोनाफाईड सर्टिफिकेट
  • 3) शाळा सोडल्याचा दाखला
  • 4) एक्सट्रॅक्ट फ्रॉम प्रायमरी स्कूल एन्ट्री
  • 5) उत्पन्न दाखवण्यासाठी इन्कम टॅक्स सेटलमेंट लेटर
  • 6) सर्कल ऑफिसर तर्फे देण्यात आलेला वेरिफिकेशन रिपोर्ट
  • 7) फॉर्म नंबर 16
  • 8) रिटायरमेंट किंवा सॅलरी होल्डर्स बँक सर्टिफिकेट
  • आणि जर अर्जदार जमिनीचा मालक असेल तर सातबारा मिळवण्यासाठी आठ अ तलाठी अहवाल यापैकी एक दस्ताऐवज सादर करावे लागेल.
शिधापत्रिकेसाठी अर्ज
  • यासाठी महाफुड डॉट जीओव्ही डॉट इन ही अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अधिकृत वेबसाईट आहे.
  • त्याच्या मेन पेजवर डाव्या बाजूला डाऊनलोड ऑप्शन ऑप्शन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर पुढच्या पेजवर वेगवेगळ्या फॉर्म्सची लिस्ट दिसेल त्यापैकी नमुना एक नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज यावर क्लिक केले असता फॉर्म ओपन होईल.
  • ज्याचे प्रिंट काढून सर्व आवश्यक माहिती भरून व इतर कागदपत्रांसहित संबंधित रेशन दुकान अथवा कार्यालयामध्ये जमा करावा लागेल.
  • त्याठिकाणी एक सूचना देखील आहे कृपया अर्ज सादर करताना रुपये दोन चा कोड फीस टाईम लावावा.
  • तर आठवणीने अर्जावर हा स्टॅम्प अवश्य लावा कोर्टफिस स्टॅम्प कोर्टात किंवा कोर्टा नजीकच्या स्टेशनरी अथवा झेरॉक्स दुकानात मिळेल. Types of Ration Card
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 thoughts on “Types of Ration Card :ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड साठी असा करू शकता अर्ज 2023”

Leave a Comment

error: Content is protected !!