SCSS Calculator :ज्येष्ठ नागरीक योजनेत बदल 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SCSS Calculator रिटायर्ड कर्मचारी किंव्हा जेष्ठ नागरिक यांच्या साठी गुंतवणूक करून नियमित व्याज मिळविण्यासाठी सरकारची सुरक्षित आणि फायदेशीर योजना म्हणजे सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ज्येष्ठ नागरिक बचत योजना, परंतु आता अलीकडेच या योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहे,

नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे आणि ही माहिती मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांच्या एका नोटिफिकेशन मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. जर तुम्हालाही या योजनेमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर सरकारमार्फत करण्यात आलेले हे आवश्यक बदल जरूर जाणून घ्या.

सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये पाच वर्षे पूर्ण झाल्यावर फक्त एकदाच तीन वर्षांसाठी खाते वाढवता येते का? त्यापेक्षा जास्त वाढवता येऊ शकते का? वाढवलेल्या कालावधीसाठी कोणता व्याजदर लागू होतो आणि इत्यादी या सर्व प्रश्नांचे उत्तरे या लेखात जाणून घ्या.

29 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झालेल्या अधिकृत नोटिफिकेशन ची लिंक खाली दिलेली आहे, या नोटिफिकेशन मध्ये आधीच्या 14 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर ऑर्डरचा रेफरन्स दिलेला आहे.SCSS Calculator 

SCSS Calculator 

सिनिअर सिटीझन – बेस्ट सेविंग स्कीम

योजनेत झालेले बदल खालील प्रमाणे आहे :-

1)

SCSS Calculator 14 नोव्हेंबर 2023 रोजी च्या ऑर्डरमध्ये पॅराफोरच्या पॉईंट दोन मध्ये ज्या ज्या ठिकाणी 55 वर्ष असा उल्लेख आहे त्या त्या ठिकाणी 50 वर्ष असे वाचण्यात यावे,

जुन्या ऑर्डर नुसार जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा तो किंवा ती कार्यरत असताना मृत्यू होत असेल आणि त्याचे किंवा तिचे वय 50 वर्ष किंवा त्याहून अधिक पण साठ वर्षांपेक्षा कमी असेल.

तर त्याच्या किंवा तिच्या वैवाहिक जोडीदाराला आता सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये इतर अटींच्या अधीन राहून वयाची परवा न करता गुंतवणूक करता येणार आहे, ही अट याआधी 55 वर्षांपेक्षा अधिक व 60 वर्षांपेक्षा कमी अशी होती.

2)

सीनियर सिटीजन सेविंग स्कीम अंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी वयाची मर्यादा ही 60 वर्षांची आहे, योजनेत जर गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी तुमचे वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक असले पाहिजे, पण काही अटींच्या अधीन राहून वॉलेटरी रिटायरमेंट घेणारे नागरिक कर्मचारी म्हणजे सिव्हिल एम्प्लॉईज ज्यांचे वय 55 वर्ष ते साठ वर्षा दरम्यान आहे.

आणि डिफेन्स कर्मचारी ज्यांचे वय 50 वर्षे ते 60 वर्ष दरम्यान आहे यांनाही योजनेमध्ये गुंतवणूक करता येते, पण त्यांना रिटायरमेंट बेनिफिट्स मिळाल्याच्या तारखेपासून एका महिन्यात गुंतवणूक सुरू करावी लागेल अशी यादीची अट होती.

SCSS Calculator 

आता घरोघरी किसान क्रेडिट कार्ड

आता ही वेळेची मर्यादा वाढवण्यात आली असून इथून पुढे त्यांना रिटायरमेंट बेनिफिट्स मिळाल्याच्या तारखेपासून पुढील तीन महिन्यांमध्ये गुंतवणूक सुरू करता येणार आहे, म्हणजे जो एक महिन्याचा कालावधी होता तो आता तीन महिने करण्यात आला आहे.

पण मग एखाद्याने या तीन महिन्यातही गुंतवणूक सुरू केली नाही तर त्या व्यक्तीला त्याचे वय 60 वर्षे पूर्ण होण्याची वाट पाहावी लागेल, म्हणजे त्याचे वय जोपर्यंत 60 वर्षे पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये गुंतवणूक करता येणार नाही.

SCSS Calculator 

3)

योजनेमध्ये गुंतवणुकीचा इनिशियल कालावधी हा पाच वर्षांचा असतो म्हणजे पहिल्या पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते, जर वाटले तर तिथून पुढे आणखी तीन वर्षांसाठी तुमचे गुंतवणुकीचे खाते वाढवता येते.

आता नवीन नोटिफिकेशन नुसार गुंतवणूकदाराला त्याच्या मृत्यूपर्यंत सीनियर सिटीजन सेविंग स्कीमचे खाते प्रत्येक तीन तीन वर्षांसाठी वाढवता येणार आहे, याचाच अर्थ यापूर्वी फक्त एकदाच तीन वर्षांसाठी खाते वाढवता येत होते पण आता ही मर्यादा काढून टाकण्यात आली आहे.

जोपर्यंत खातेधारक जिवंत आहे तोपर्यंत त्याला वाटत असेल तर दर तीन-तीन वर्षासाठी तीन तीन वर्षाच्या ब्लॉगमध्ये त्याला आता खाते वाढवता येणार आहे.
म्हणजे गुंतवणूक सुरूच राहणार आणि त्या त्या वेळेचा व्याजदर त्यावर लागू होऊन दर 3 महिन्यांनी व्याज त्या गुंतवणूक दाराला मिळत राहणार.

SCSS Calculator 

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात असू द्या वाढवलेल्या खात्यावर किंवा गुंतवणुकीवर मॅच्युरिटीच्या दिवशी जो व्याजदर असेल किंवा वाढवलेल्या मॅच्युरिटीच्या दिवशी जो व्याजदर असेल तो पुढे लागू होतो.
जसे की तुमच्या गुंतवणुकीची पहिल्या 5 वर्षांची मुदत 31 डिसेंबर 2023 ला संपत आहे आणि खाते आणखी तीन वर्षांसाठी वाढवायचे असेल.

तर 31 डिसेंबर 2023 रोजी जो व्याजदर योजनेमध्ये लागू असेल तो पुढच्या तीन वर्षांसाठी लागू केला जाईल.
तसेच त्यानंतरही खाते वाढवायचे असेल तर तीन वर्ष ज्या दिवशी पूर्ण होतील त्या दिवशी जो व्याजदर असेल तो लागू केला जाईल.SCSS Calculator 

4 )

प्री मॅच्युअर अकाउंट क्लोजर संदर्भात म्हणजे जर तुम्हाला मुदतपूर्व खाते बंद करायचे असेल तर त्यामध्ये काय बदल झाला आहे, जर खाते तीन वर्षांसाठी एक्सटेंड केले वाढवले पण काही कारणांमुळे तुम्हाला ते बंद करायचे असेल किंवा गुंतवणूक थांबवायची असेल तर त्यावर आता पेनल्टी भरावी लागेल.

म्हणजे एक वर्ष पूर्ण होण्याआधीच खाते बंद करायचे असेल तर खात्यामध्ये जी काही जमा रक्कम असेल त्या रकमेच्या 1 टक्का रक्कम पेनल्टी म्हणून कापून घेतली जाईल आणि बाकीचे रक्कम तुम्हाला परत केली जाईल.

SCSS Calculator 

पोस्‍ट ऑफिस की ये सुपरहिट स्‍कीम देगी रकम को दोगुना करने की गारंटी

हे बदल कोणाला लागू असणार

  • सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये झालेले बदल किंवा लागू झालेले नव्या नियम हे एक्झिस्टिंग अकाउंट होल्डर म्हणजे जुन्या खातेधारकांना आणि नवीन खातेदार किंवा गुंतवणूकदार या दोघांनाही लागू असतील.
  • ही नोटिफिकेशन येण्याआधीच तुमच्या योजनेमध्ये खाते सुरू असेल आणि इथून पुढे तुम्हाला आता ते कायम सुरू ठेवायचे असेल तर नवीन नियमानुसार ते तीन तीन वर्षांसाठी वाढवता येणार आहे. SCSS Calculator 
  • त्यासाठी नवीन खाते उघडण्याची गरज नाही तर हे आहे सीनियर सिटीजन सेवेन स्कीम चे नवे महत्त्वपूर्ण नियम
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 thoughts on “SCSS Calculator :ज्येष्ठ नागरीक योजनेत बदल 2023”

Leave a Comment

error: Content is protected !!