Kisan Tractor Yojana :ट्रॅक्टर साठी आता 5 लाख रु. अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kisan Tractor Yojana ट्रॅक्टरच्या अनुदानात मोठी वाढ करण्यात आलेली आहे पूर्वी ट्रॅक्टर साठी 1 लाख 25 हजार रुपये अनुदान दिलं जात होतं परंतु आता या अनुदानात वाढ करून 5 लाख रुपयापर्यंतचा अनुदान आता शेतकऱ्यांना दिल जाणार आहे ट्रॅक्टर खरेदीसाठी,

ट्रॅक्टर सोबतच ट्रॅक्टर चलित जी काही अवजार आहे, रोटावेटर असेल, कल्टीवेटर असेल या व्यतिरिक्त पावर विडर, वगैरे ही जी काही ट्रॅक्टरचलीत अवजारे आहे. त्यांच्या अनुदानात देखील मोठी वाढ करण्यात आलेली आहे. तर ट्रॅक्टरचलित घटक व ट्रॅक्टर साठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या. अगदी तुम्ही मोबाईल वरून घरबसल्या ट्रॅक्टर साठी अर्ज करू शकता.

Kisan Tractor Yojana 

Tractor अवजारे अनुदान लिस्ट लिंक

कोणत्या घटकासाठी कोणत्या अवजारासाठी किती अनुदान मिळणार

  • Kisan Tractor Yojana 40 एचपी पर्यंतचे ट्रॅक्टर आहे 4 WD त्यासाठी पाच लाख रुपये पर्यंतचा अनुदान आहे.
  • हे अनुदान SC, ST व जे अल्पभूधारक शेतकरी आहे त्यांसाठी आहे.
  • ज्यांची जमीन 1 हेक्टर पेक्षा जास्त आहे किंवा बहुभूधारक शेतकरी असेल त्यांना फक्त 4 लाख रुपये पर्यंतच अनुदान मिळणार आहे.
  • आता 4 WD आणि 2 WD हा जो पर्याय आहे तो तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना निवडू शकता.
  • अर्ज करताना कोणता प्रकार निवडायचा आहे त्या ठिकाणी दोन ऑप्शन असतील 4 डब्ल्यू डी ट्रॅक्टर आणि 2 डब्ल्यू ट्रॅक्टर तर टू डब्लू डी ट्रॅक्टरचं साडेतीन लाख रुपयापर्यंतचा अनुदान या ठिकाणी मिळू शकत.
  • ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर अवजार देखील आहे ज्यांचा अनुदान सात सात आठ नऊ नऊ दहा लाख रुपये पर्यंतचा अनुदान देणारी अवजार देखील या यादीमध्ये दिलेली आहे.
  • ही जी अनुदानाची यादी आहे कोणत्या घटकाला किती अनुदान मिळतं ती अनुदानाची पीडीएफ लिस्ट ची लिंक खाली दिलेली आहे.
  • त्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला ही यादी डाऊनलोड करता येईल.
Kisan Tractor Yojana 

👉 अनुदानाची यादी 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रॅक्टर साठी ऑनलाइन अर्ज कसा सादर करायचा Kisan Tractor Yojana 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम गुगलला या आणि इथे टाईप करायचा आहे महाडीबीटी फार्मर लॉगिन,

महाडीबीटी फार्मर लॉगिन या पर्यायावर क्लिक करा,

काहीजण महाडीबीटीच्या स्कॉलरशिपच्या वेबसाईट वर जातात आणि तिथे अर्ज नोंदणी करायचा प्रयत्न करतात आणि त्यांचं त्या ठिकाणी चूक होते.
तर महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन हे जे पोर्टल आहे ते आहे फार्मर साठी तर तुम्ही सर्च करतानाच असो सर्च करा महाडीबीटी फार्मर लॉगिन,

असं सर्च केल्यानंतर लॉगिन आणि न्यू रजिस्ट्रेशन असा पर्याय दिसतो.

ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं नाही त्यांनी न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करा आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेला आहे त्यांनी लॉगिन वर क्लिक करा.

रजिस्ट्रेशनची प्रक्रिया एकदम सोपी आहे रजिस्ट्रेशन तुम्ही ऑनलाईन करू शकता.

Kisan Tractor Yojana 

बँका देतायतं पोल्ट्री व्यवसायासाठी विविध योजना

लॉगिन करून नेमका जो अर्ज आहे तो अर्ज करताना ट्रॅक्टरचा जो घटक आहे तो कसा निवडायचा ते समजून घ्या.

लॉगिन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर समोर पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केला असेल तर वापर करता आयडी किंवा आधार क्रमांक टाकून ओटीपी टाकून लॉगिन करू शकतात.

कॅपचा कोड लॉगिन या पर्यायावर क्लिक करा लॉग इन केल्यानंतर तुमची वैयक्तिक तपशील जर पूर्ण भरला गेला असेल प्रोफाइल पूर्ण भरली असेल तर समोर अर्ज करा हा पर्याय दिसेल.

जर प्रोफाइल पूर्ण भरलेली नसेल तर अगोदर प्रोफाइल मध्ये सर्व माहिती भरा तुमचा बँक अकाउंट डिटेल सातबारा आठ ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर समोर एक पेज ओपन होईल.

अर्ज करा हा पर्याय हा वेबसाईटच्या होम पेजवर दिसतोय तर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा, नंतर एक शेतकरी एक अर्ज अशा प्रकारचा टॅब ओपन होतो ज्यामध्ये सर्वात प्रथम सुरुवातीलाच दिसेल कृषी यांत्रिकीकरण उप अभियान राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना. Kisan Tractor Yojana 

Kisan Tractor Yojana 

ट्रॅक्टर कृषी अवजारे अनुदानात वाढ

राज्य शासन व केंद्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने म्हणजे एकत्रीकरणातून कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज केले जातात, तर सुरुवातीचीच बाब आहे ट्रॅक्टर सारखा चिन्ह दिसतय किंवा इकडं बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक करा.

त्यावर क्लिक केले असता कृषी यांत्रिकीकरणाच्या घटकांमध्ये येईल तर या ठिकाणी मुख्य घटक हा जो पर्याय आहे यामध्ये निवडा.
कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यावर क्लिक केल्यानंतर तपशील मध्ये निवडा कोणता यंत्र लागत आहे ते निवडा.

जसे की ट्रॅक्टर निवडा ट्रॅक्टर निवडल्यानंतर व्हील ड्राईव्हचा प्रकार निवडा, वर नमूद प्रमाणे 2 WD आणि 4 WD या ठिकाणी ते निवडून घ्या नंतर एचपी ची श्रेणी निवडून घ्या, 41 ते 70 पी.टी.ओ. HP किंवा 31 ते 40 पि. टी.ओ. HP निवडून घ्या.

40 एचपी पर्यंतचे जे ट्रॅक्टर आहे त्यासाठी जवळपास 5 लाख रुपये पर्यंतचा अनुदान मिळतं तर तो पर्याय या ठिकाणी निवडा.
तुम्हाला पाहिजे ती HP निवडू शकता त्यानंतर खाली जो चेक बॉक्स आहे मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही.Kisan Tractor Yojana 
असे या ठिकाणी सांगितलेल आहे त्याला टिक करा आणि जतन करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर 23 रुपये 60 पैशाचा एक पेमेंट करावा लागेल आणि जे काही अर्ज भरले असतील ते तुम्ही इथं चेक करू शकता.
भरलेले अर्ज तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुख्य पृष्ठ, वैयक्तिक तपशील, पिकांचा तपशील, इतर माहिती सादर करा मी अर्ज केलेल्या बाबी तर अशा पद्धतीने अर्ज सादर करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Kisan Tractor Yojana :ट्रॅक्टर साठी आता 5 लाख रु. अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज”

Leave a Comment

error: Content is protected !!