Lakhpati Didi Yojana :लखपती दीदी योजना; 2 करोड महिलांना मिळणार योजनेचा लाभ, लागणारे कागदपत्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lakhpati Didi Yojana

Lakhpati Didi Yojana देशातील महिला या खेड्यापासून शहरापर्यंत कुठल्याही क्षेत्रामध्ये अगदी अग्रस्थानी काम करताना दिसून येतात प्रत्येक क्षेत्रामध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या या महिला अशा महिलांसाठी पंतप्रधान देशाला संबोधित करत असताना म्हणाले की गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला अंगणवाडी सेविका आरोग्यसेविका यांना दीदी या नावाने संबोधले जाते. अशाच महिलांना लखपती बनवण्यासाठी शासन योजना आखत आहे बचत गटाशी सलग्न असलेल्या महिलांना विविध कौशल्याचा प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवून त्यांना लखपती करणे आहे.

या कार्डचे नेमके फायदे काय ? ई श्रम कार्ड अर्ज पद्धत,

विविध कौशल्याच प्रशिक्षण

  • Lakhpati Didi Yojana प्रशिक्षणामध्ये महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब निर्मिती, ड्रोन चालवणे, विविध यंत्र दुरुस्ती, अशा प्रकारची विविध कौशल्य प्रशिक्षणातून देण्यात येणार आहे.
  • शासनाच्या या निर्णयामुळे महिलांच्या कुटुंबाचे आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.
  • त्यामुळे महिला सक्षम व स्वावलंबी बनतील आणि हाच एकमेव उद्देश आहे.

Lakhpati Didi Yojana लागणारे कागदपत्र

  • अर्जदार महिलेचा आधार कार्ड,
  • पॅन कार्ड ची झेरॉक्स,
  • बँक पासबुक झेरॉक्स,
  • शैक्षणिक कागदपत्र,
  • मोबाईल क्रमांक,
  • पासपोर्ट आकाराचा फोटो,

फक्त 396 मध्ये 10 लाखाचा विमा, पोस्ट ऑफिस योजना

पात्रता काय ?

  • Lakhpati Didi Yojana तर सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिला असणे आवश्यक आहे.
  • त्याबरोबर बचत गटाच्या सदस्य असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेणार आहे.
  • अर्जदार महिलेचा वार्षिक उत्पन्न हे कमी असणे गरजेचे आहे.
  • त्याबरोबर या योजनेत समाविष्ट झाल्यानंतर महिलांचे प्रशिक्षण घेण्याची पूर्ण तयारी असणे आवश्यक आहे.
  • जर त्यांची प्रशिक्षण घेण्याची तयारी असेल क्लास करण्याची तयारी असेल तरच महिलांनी या योजनेचा अर्ज भरावा.

लाभ कसा मिळणार आहे ?

  • लखपती दीदी योजना या नावाप्रमाणे योजनेचा सर्वात मोठा फायदा महिलांना होणार आहे.
  • विविध क्षेत्रातील प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य देऊन महिलांना लखपती बनवलं जाणार आहे.
  • महिलांना त्यांच्या आवडीच्या लघु उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन प्रशिक्षणाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
  • त्याप्रमाणे त्यांना विविध लघुउद्योगासाठी लागणारा मार्गदर्शन प्रशिक्षण आर्थिक सहाय्यक हे सगळे या योजनेच्या मार्फत मिळणार आहे.

जमीन एनए N/A (बिनशेती) कशी करायची? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

Lakhpati Didi Yojana अर्ज कोठे करायचा ?
  • या योजनेची घोषणा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 या दिवशी केली आहे.
  • या योजनेची आत्ताच घोषणा केल्यामुळे ही योजना अद्याप पर्यंत सुरू झाली नाही.
  • पण ही योजना लवकर सुरू करण्यात येणार आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Lakhpati Didi Yojana :लखपती दीदी योजना; 2 करोड महिलांना मिळणार योजनेचा लाभ, लागणारे कागदपत्र”

Leave a Comment

error: Content is protected !!