PIK Nuksan Bharpai :3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PIK Nuksan Bharpai ई – केवायसी केलेल्या राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांकरिता मदतींचा 210 कोटी तीस लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. मंत्री श्री पाटील यांनी संगणकीय प्रणालीवर कळ दाबून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केली. जे लाभार्थी ई केवायसी पूर्ण केलेले आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम आजपासून जमा होण्यास सुरू करण्यात आली आहे.

‘या’ योजनेत 2 कोटी महिलांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण; जाणून घ्या कसा होईल फायदा?

ही निधी कधीची व कशा पद्धतीने मिळणार ?

  • PIK Nuksan Bharpai गेल्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानी करिता.
  • शासनाने विशेष बाब म्हणून पंधराशे कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे.
  • हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाने निश्चित केलेल्या डीबीटी प्रणालीमार्फत या निधीचे वितरण सुरू आहे.
  • आज मंत्रालयामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री श्री पाटील यांनी निधी वितरणाचा आढावा घेतला.
  • त्यावेळी ई केवायसी केलेल्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात हा निधी थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
  • उर्वरित जिल्ह्यांना कधी मिळणार पुढील शुक्रवार पर्यंत आणखी दोन लाख 50 हजार शेतकऱ्यांना 178.25 कोटी इतका निधी त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती यावेळी दिली आहे.
  • त्याप्रमाणे शेती पिकांच्या नुकसानकरिता तातडीने मदत मिळावी यासाठी आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ई केवायसी करण्याची मंत्री श्री पाटील यांनी शेतकऱ्यांना आव्हान दिले आहे.
  • ई सेवा निशुल्क असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे.
  • तसेच डीबीटी प्रणाली मध्ये काही त्रुटी असल्यास त्या त्रुटी तातडीने दूर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
  • शासन शेतकऱ्या प्रति सजग असून शेतकऱ्यांकरिता कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे सुद्धा माहिती देण्यात आली आहे.
  • तसेच शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर इ केवायसी करून घेण्याची सूचना सर्व तहसील व जिल्हा यंत्रणा मंत्री श्री पाटील यांनी दिली आहे.
  • यामध्ये जे जिल्हे 14 ठरवण्यात आलेले आहेत पात्र ते कोणकोणते आहे जाणून घ्या खालील नुसार.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट

PIK Nuksan Bharpai शासन निर्णय :-

  • सन 2020 च्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषा बाहेरील पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानिकरीता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग अंतर्गत २० जून 2023 रोजी एक शासन निर्णय घेण्यात आला होता.
  • या शासन निर्णयाच्या माध्यमातून 14 जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले होते.
  • हे कोणते 14 जिल्हे आहे त्यानंतर निधी सुद्धा किती मंजूर करण्यात आला होता या शासन निर्णयामध्ये सुद्धा स्पष्टपणे देण्यात आल आहे.
  • सन 2022 या पावसाळी हंगामातील अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान एकरीता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रलंबित निधी मागणीच्या प्रस्तावामधील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता,
  • वर नमूद अनुक्रमांक 15 येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार एकूण निधी सांगण्यात आलेली आहे.
  • पंधराशे कोटी रुपये इतका निधी सोबतच्या प्रपत्र दर्शविल्याप्रमाणे जिल्हा निहाय वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.

गावठाण मालमंत्ता रजिस्ट्री [दस्त नोंदणी] महसूलची NOC आवश्यक

हे 14 जिल्हे पात्र असणार

  • PIK Nuksan Bharpai प्रत्येक जिल्ह्यानुसार निधी शेतकरी ची संख्या बाधित क्षेत्र किती आहे आणि निधी किती आहे हे सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे.
  • अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, जळगाव, जालना, नागपूर, नासिक, धाराशिव, परभणी, सोलापूर, वाशिम, असे हे 14 जिल्हे पात्र ठरविण्यात आलेले आहे.
  • पात्र सर्वप्रथम त्यानंतर जे उर्वरित जिल्हे राहिलेले आहे अशा उर्वरित जिल्ह्यांना सुद्धा पुढील शुक्रवारपासून त्यांना निधी मिळणार आहे.
  • जे लाभार्थी ई केवायसी पूर्ण केलेले आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होण्यास सुरू करण्यात आली आहे.

पाहा जिल्हानिहाय वितरित निधी आणि शेतकरी संख्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “PIK Nuksan Bharpai :3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात. ”

Leave a Comment

error: Content is protected !!