Land Record :जमिनीचे शासकीय भाव कसे पाहायचे ते येथे सविस्तर जाणून घ्या?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land Record

Land Record ज्या गावातून येतात त्या गावातील जमिनीचा सरकारी भाव किंवा दर आणि शहरातील जमिनीचा सरकारी भाव आणि दर कसा पाहायचा ते खालील नुसार आहे.

जमिनीचे शासकीय भाव पाहण्यासाठी क्लिक करा

गावातील जमिनीचा सरकारी दर

  • Land Record तर त्यासाठी सगळ्यात आधी आय जी आर महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन म्हणजे आय जी आर एम ए एच ए आर एस टी आर ए डॉट जीओव्ही डॉट इन सर्च करायचं आहे.
  • त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाईट समोर ओपन होईल.
  • त्या वेबसाईटवर डावीकडे महत्त्वाचे दुवे हा रखाना दिसेल यातील मिळकत मूल्यांकन या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर बाजार मूल्य दर पत्रक नावाचा एक नवीन फेस समोर ओपन होईल.
  • त्या पेजवर महाराष्ट्राचा नकाशा दिलेला असेल आता ज्या जिल्ह्यातील जमिनीचा शासकीय भाव पाहायचा आहे त्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करा.
  • त्यानंतर एक नवीन पेज समोर ओपन होईल त्या पेजवर सगळ्यात आधी येअर् या राखण्यात वर्ष निवडा.
  • आणि त्यात असलेल्या लैंग्वेज या रकान्यात जाऊन मराठी भाषा निवडू शकता.
  • त्यानंतर इतर सुरुवातीला जो जिल्हा निवडला त्याचं नाव आपोआप आलेला दिसून येईल.
  • पुढे तालुका आणि गावाचं नाव टाका गावाचं नाव निवडलं की खाली गावातील जमिनीचे सरकारी भाव दिसून येतील.
  • यात असेसमेंट टाईप मध्ये जमिनीचा प्रकार दिसेल या प्रकारानुसार पुढे असेसमेंट रेंज आणि रेट म्हणजे जमिनीचा सरकारी भाव दिलेला असेल.
  • आता जी सरकारी भावाची किंमत दिली असती जमिनीची ती प्रति हेक्टर नुसार किंमत दिलेली असते.

शेतकऱ्यांना मिळणार 1 ते 3 लाखापर्यंत पीक कर्जावर सवलत; शून्य टक्के व्याज दराने

Land Record असेसमेंट रेंज म्हणजे नेमकं काय आहे ?

  • असेसमेंट रेंज नुसार जमिनीचे जो काही शासकीय भाव आहे तो कमी जास्त होताना दिसून येईल.
  • तर असेसमेंट रेंज म्हणजे जमिनीचा प्रति हेक्टरी आकार पण तो नेमका कसा काढायचा.
  • शेतकरी असाल तर सातबारा उतारा असेल या सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्याच्या नावासमोर त्याच्या नावावर किती क्षेत्र आहे ते दिलेलं असतं.
  • आणि त्यापुढे त्यावर किती आकार आकारणी केला जातो त्याची माहिती असते.
  • जर का असेसमेंट रेंज काढायचे असेल तर आता असेसमेंट जे सूत्र आहे ते म्हणजे असेसमेंट रेंज इज इक्वल टू किंवा बरोबर आकार भागिले क्षेत्र म्हणजे 4.94 भागिले १.२६ तर असेसमेंट रेंज तर अशाप्रकारे हे असेसमेंट रेंज काढायची आहे.
  • आणि त्या असेसमेंट रेंजचा जो प्रकार आहे त्या प्रकारानुसार जमीन किती रुपयांना किंवा जमिनीचा सरकारी बाजारभाव काय आहे ते त्याठिकाणी पाहू शकता.

सततचा पाऊस अनुदान अपडेट धाराशिव जिल्हा

शहरातील दर कसा पाहायचा ?

  • Land Record जर एखाद्या शहरातल्या एखाद्या विशिष्ट भागातील जमिनीचा सरकारी भाव बघायचा असेल.
  • तर त्यासाठी पुन्हा एकदा बाजारमूल्य दर पत्रक पेजवर परत यायचा आहे.
  • आणि ज्या सहराचा पाहायचा आहे तो निवडा आणि तालुका निवडा, गावाचं नाव महानगरपालिका ज्याठिकाणी महानगरपालिका असेल ते शहर निवडा.
  • त्यानंतर त्या पेजवर एक रखाना दिसेल त्या रकान्यात सुरुवातीला सर्वे नंबर असेल.

आता ग्रामपंचायत चे सर्व दाखले पहा तुमच्या मोबाईल वर ?

  • त्या सर्वे नंबर वर क्लिक केलं की त्या उपविभागात कोणकोणते सर्वे नंबर येतात त्यांची नावे खाली दिलेली असतात.
  • आणि त्यासमोर उपविभागाचे नाव असेल आणि पुढे प्रती चौरस मीटर या एककानुसार जमिनीचा दर दिलेला असेल.
  • जसं खुली जमीन असेल तर 14,300 रुपये प्रति चौरस मीटर, निवासी सदनिकेसाठी 30500 रुपये प्रति चौरस मीटर, ऑफिस साठी 35 हजार पाचशे रुपये प्रति चौरस मीटर, आणि दुकानांसाठी 53 हजार रुपये प्रति चौरस मीटर असे जमिनीचे सरकारी भाव पाहू शकता.
  • अशा प्रकारे तुमच्या शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जमिनीचे सरकारी भाव नेमके काय आहे ते मोबाईलवर जाणून घेऊ शकता. Land Record

Land Transfer Record अब सिर्फ 100 रुपये में कराए जमीन की रजिस्ट्री

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Land Record :जमिनीचे शासकीय भाव कसे पाहायचे ते येथे सविस्तर जाणून घ्या?”

Leave a Comment

error: Content is protected !!