ayodhya yatra :धुळे ते अयोध्या यात्रा बुकिंग सुरू 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ayodhya yatra 22 जानेवारीला श्री रामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संपूर्ण देशातून भक्त दर्शनासाठी आयोध्येच्या दिशेने येत आहेत, मिळेल त्या साधनाने प्रवास करून भक्त आयोध्या नगरीत दर्शनासाठी गर्दी करत आहेत, महाराष्ट्रातल्या भक्तांनाही सहजपणे दर्शनासाठी जाता यावे यासाठी आता राज्य परिवहन महामंडळाची बस म्हणजे लालबरी थेट आयोध्या नगरीत तुम्हाला घेऊन जाणार आहे,

10 फेब्रुवारी 2024 रोजी पहिली बस धुळे आगारातून अयोध्येच्या दिशेने रवाना झाली. त्यासाठी प्रवासांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेता एसटी महामंडळाने 18 फेब्रुवारीला पुन्हा ST ची बस अयोध्येसाठी रवाना करणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी सविस्तर वेळापत्रक बस कधी सुटणार कुठून सुटणार, प्रवाशांना किती पैसे खर्च करून अयोध्येचे तिकीट मिळणार, किती मोठा हा प्रवास असणार, प्रवासातले वेगवेगळे टप्पे कोणते, तसेच इतर सर्व माहिती त्यांनी जाहीर केली आहे आणि तीच माहिती जाणून घ्या खालील नुसार.

ayodhya yatra

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

धुळे ते अयोध्या प्रवासाचे टप्पे

  • एसटी महामंडळाची बस 18 फेब्रुवारी 2024 रोजी म्हणजे रविवारी पहाटे चार वाजता धुळे बस स्टँडवरून सुटणार आहे. ayodhya yatra
  • प्रवास धुळे ते आयोध्या असा होणार असून प्रवास पाच दिवसांचा असेल.
  • यादरम्यान 3 मुक्काम केले जातील बस 18 तारखेला धुळ्याहून पहाटे चार वाजता निघाल्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत झांसी मध्ये पोहोचेल तिथे पहिला मुक्काम असणार आहे.
  • दुसऱ्या दिवशी 19 फेब्रुवारीला म्हणजे सोमवारी पहाटे 5 वाजता झांसी वरून बस अयोध्येच्या दिशेने निघणार असून दुपारी तीन वाजेपर्यंत आयोध्येला पोहोचेल.
  • त्या रात्रीचा मुक्काम अयोध्या मध्येच असणार आहे ज्यामुळे भक्तांना श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
  • पुढे 20 फेब्रुवारी मंगळवारी पुन्हा पहाटे 5 वाजता बस अयोध्या वरून निघेल आणि सकाळी दहा वाजेपर्यंत वाराणसीला पोहोचेल जिथे दहा ते तीन यामध्ये देवदर्शनाचा आनंद घेता येईल.
  • नंतर वाराणसी ते प्रयागराज असा प्रवास सुरू होईल आणि संध्याकाळी सहा वाजता बस प्रयागराज येथे पोहोचेल.
  • चौथ्या दिवशी म्हणजे 21 फेब्रुवारी बुधवारी परतीचा प्रवास सुरू होईल आणि पाचव्या दिवशी म्हणजे 22 फेब्रुवारी गुरुवारी बस पुन्हा धुळे स्थानकात पोहोचेल.
  • असे संपूर्ण धुळे आयोध्या प्रवासाचे टप्पे असणार आहे.
ayodhya yatra

👉 तुम्हाला हे माहित आहे का?

या प्रवासासाठी तिकिटाचे दर ayodhya yatra

  • या प्रवासासाठी तिकिटाचा दर प्रत्येक प्रवासी 4 हजार 545 रुपये इतका असेल,
  • जवळपास पंधराशे ते सोळाशे किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे.
  • प्रवासासाठी सुसज्जन नवीन लाल परी असेल त्यात पुशबॅक सीड्स असतील आणि प्रवासही सुरक्षित होईल.
  • जर तुम्हाला धुळे आयोध्या यात्रेसाठी तिकीट बुक करायचे असेल तर तुम्ही धुळे शिरपूर, साखरी, दोंडाईचा, आणि नंदुरबार या बस डेपोतील डेपो मॅनेजरला संपर्क करू शकता.
  • तसेच त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर हे महामंडळातर्फ देण्यात आले आहे. ayodhya yatra
ayodhya yatra

SBI बैंक पर्सनल लोन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “ayodhya yatra :धुळे ते अयोध्या यात्रा बुकिंग सुरू 2024”

Leave a Comment

error: Content is protected !!